जागतिक स्थलांतरित पक्षीदिनी मेहरूण तलावावर पक्षीनिरीक्षण उपक्रम संपन्न
हिमालयीन पाहुण्या पक्ष्यांचे तलावावर झाले आगमन.
शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त जळगाव येथील
मेहरूण तलावावर पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. सन २००६ पासून हा दिवस
साजरा करण्यास सुरवात झाली असून वर्षातुन दोनदा मे व ऑक्टोबर या महिन्यांचा
दुसऱ्या शनिवारी हा दिन साजरा करण्यात येतो.त्यानिमित्य जगभर पक्षी संवर्धनासाठी
नवनवीन संकल्पना घेऊन विविध स्पर्धा,उपक्रम घेण्यात येतात.याचा एक भाग म्हणून
निसर्गमित्र तर्फे सकाळी ६.३० ते ८.०० या दीड तासात मेहरूण तलावावर पक्षीनिरीक्षण
उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात नागरिक व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग
नोंदवला.या वेळी स्थानिक व स्थलांतरित मिळून एकूण ३६ जातीच्या पक्ष्यांची नोंद
करण्यात आली.
पक्षीनिरीक्षणात हिमालयातून येणारे पांढरा धोबी,करडा धोबी,निळ्या शेपटीचा वेडा राघू
आणि देशी तुतारी या स्थलांतरित पाणथळ पक्षांची नोंद घेतल्याची माहिती पक्षीमित्र
शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
या स्थलांतरीत पक्ष्यांसोबत जंगल सातभाई ,माळमुनिया,हळद्या, जांभळा सूर्यपक्षी,
शिक्रा,भारतीय दयाळ इत्यादी वृक्ष निवासी पक्षी आढळून आले.लवकरच नकटया,चक्रवाक,
गडवाल,चक्रांग,नदी सुरय,रंगीत करकोचा,कांडेसर,मोरशराटी,भारतीय पाणकावळा,
मोठा पाणकावळा,अशा पाणथळ जातीच्या पक्ष्यांचे तसेच बहिरी ससाणा,कैकर,युरेशिय
दलदल हरीण या शिकारी पक्ष्यांचे लवकरच आगमन होईल,आम्ही त्यांच्या आगमनाची
आतुरतेने आम्ही वाट बघत असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.
तलाव काठोकाठ भरला असल्याने व तो टाकीसारखा खोल खोदल्याने काठावर दलदलीच
अभाव आहे त्यामुळे पाणथळ पक्ष्यांना येथे येण्यास वेळ लागेल.तसेच जळगाव जिल्ह्यात
व एकूणच महाराष्ट्रात सर्वत्र उत्तम पाऊस झाल्याने नद्या,तलाव,धरणे,विविध पाणवठे
तुडुंब भरली असल्याने पाणथळ पक्ष्यांच्या अधिवसाला अनुकूल वातवरण झाले असून
त्यांना मुबलक अन्न मिळणार असल्याचे आशादायक वातावरण असल्याचे पक्षीमित्र
शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.पण या सोबतच मेहरूण तलावाचा किनारा प्लास्टिक
व अन्य कचऱ्याने वेढलेला असल्याने या पक्ष्यांसाठी तो धोकादायक ठरणार असल्याची
भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शनिवार दि.१२ ऑगस्ट जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पक्षी
निरीक्षणात पक्षीनिरीक्षक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांच्या सोबत डॉ.योगेश टेणी,गोकुळ
इंगळे,सागर इंगळे,हरीष सोनावणे,अनिकेत खरे,राजेश गोपाळ,महेंद्र चौहाण,नीरज पवार,
चरण राठोड हे विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.
सन २०१९ या वर्षीचे घोषवाक्य `Protect Bird :Be The Solution To Plastic
Pollution ” हे आहे. कारण प्लास्टिक प्रदुषणामुळे पृथ्वीवरील पाणथळ पक्ष्यांसोबत
वृक्षनिवासी,माळरानावरील असे एकूण वेगवेगळ्या अधिवासात राहणाऱ्या सर्व पशु,पक्षी
जगताला प्लास्टिक मुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या
मार्गावर आहेत.हेच चित्र जळगावातील मेहरूण तलावर दिसले असून याची गंभीर दखल
मा.आयुक्त जळगाव म.ना.पा. यांनी घ्यावी व उपाययोजना करावी अशी आमची नम्र
विनंती आहे.
------------------------------------------------------)(---------------------------------------------
`